ज्वारी लागवड
by 𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
🗂️ Lifestyle
Features ज्वारी लागवड
ज्वारी लागवड कशी कधी करावी ज्वारी लागवडीचे तंत्रज्ञान लागवड माहिती व्यवस्थापन ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले.
खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते.
जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो.
सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे, मात्र उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे.
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा प्रथम असून त्यानंतर अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.
खरीप हंगामात नांदेड व लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी घेतली जाते.
जमिनीच्या खोलीनुसार पेरणी:रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी,चांगला निचरा होणारी जमिन निवडावी.
जमिनीच्या खोलीनुसार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुधारित वाणांची निवड करावी.
हलकी जमिन (30 ते 45 से.मी.
खोल), मध्यम खोल जमिन (45 ते 60 से.मी.खोल) व भारी जमिन (60 से.मी.
पेक्षा जास्त खोल) अशा जमिनीच्या खोलीनुसार रब्बी ज्वारीचे वाण निवडावेत.कोरडवाहू ज्वारीची पेरणीपूर्वी रानबांधणी केल्यास उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे.
त्यासाठी जुलैचा पंधरवाड्यात पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी 10x12 चौ.मी.
आकाराचे वाफे तयार करावेत.
सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात किंवा 2.70 मीटर अंतरावर सरी यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळीराम नांगरच्या सहाय्याने दंड टाकावेत.
त्यामुळे 15 जुलै ते 15 सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यास मदत होते.रब्बी ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची मशागत पेरणी पूर्वी करावी.
उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
हेक्टरी ६ टन शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी टाकावे.बीजप्रक्रिया:कोरडवाहू रब्बीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी.
शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर पेरणी करणे हिताचे आहे.
योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव अधिक होतो.
पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी.
त्यासाठी 1 किलो बियाण्यास 300 मेष गंधकाची 4 ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
त्यामुळे कानी हा रोग येत नाही.
गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने 45 से.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे दिन स्वतंत्र चाड्यातून पेरावे.
कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर २० से.मी ठेवावे.
पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश दयावे.ज्वारीची उगवण झाल्यावर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करावी.पिकाच्या सुरवातीच्या 35 ते 40 दिवसात पीक तणविरहित ठेवावे.
पेरणीनंतर आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी.
पहिली पेरणीनंतर तीन आठवड्यानी फटीच्या कोळप्याने करावी.
दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यानी पासच्या कोळप्याने करावी, त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो व तिसरी कोळपणी आठ आठवड्यानी दातेरी कोळप्याने करावी.
त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.खत व्यवस्थापन:रब्बी ज्वारीचे सुधारीत व संकरित वाण खाताना चांगला प्रतिसाद देतात.
कोरडवाहू ज्वारीस 1 किलो नत्र दिल्यास 10 ते 15 किलो धान्याचे उत्पन्न वाढल्याचे दिसून आले आहे.
तक्त्यात दिल्याप्रमाणे खत मात्रा द्यावी.जमिनीची प्रकार (खोली से.मी.)ज्वारीचे वाणरासायनिक खते (किलो/हे)नत्र (युरिया)स्फुरद (एसएसपी)पालाश (एमओपी)हलकी (30-45 से.मी.)फुले अनुराधाफुले माऊली25 (55)मध्यम (45-60 से.मी)फुले सुचित्राफुले चित्राफुले माउलीमालदांडी 35-1परभणी मोती40 (87)20 (125)भारी (60 पेक्षा जास्त )फुले वसुधाफुले यशोदापीकेव्ही-क्रांतीसी एस व्ही-2260 (130)30 (188)कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी 50:25:25 नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.
त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी.
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the ज्वारी लागवड in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above